Saturday, September 14, 2024
HomeजळगावBreaking News गुराख्यासह दहा जनावराचा रेल्वेखाली मृत्यू

Breaking News गुराख्यासह दहा जनावराचा रेल्वेखाली मृत्यू

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

- Advertisement -

चाळीसगाव-जामदा रेल्वे स्थानका दरम्यान तालुक्यतील शिंदवाडी शिवारात चाळीसगाव-धुळे डाऊन मेमोे ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह जवळपास १० जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हि घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.

बेपत्ता तरुणाचा आढळला मृतदेह

गुराख्यासह जनवारांचा मृत्यू झाल्याने शिंदवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयताचा नावे रोजंद्र सुर्यवंशी असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी मेहुणबारे पोलिसांनी धाव घेतली असून ते पंचनामा करीत आहे. गुराखी राजेंद्र सुर्यवंशी गुरे चारल्यानतंर घरी जाण्यासाठी रेल्वे रुळ पार करताना ही दुदैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

बेपत्ता तरुणाचा आढळला मृतदेह

मयत जनावरांमध्ये गायी, म्हशी व वासराचा समावेश असल्याचे कळते आहे. घटनास्थळाचे जनावरांच्या मृतदेहांचे सर्वत्र तुकड्याच्या खच पडलेला असल्याचे विचित्र दृश्य दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांंनी पंचनामा केल्यानतंरच नेमके किती जनावरे होते, याची संख्या कळू शकणार आहे. परंतू पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एक इसम व दहा जनावरे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या