Sunday, July 5, 2026
Homeजळगावजळगाव : विहिरीत पाय घसरून युवकाचा मृत्यू

जळगाव : विहिरीत पाय घसरून युवकाचा मृत्यू

पारोळा – श. प्र.

तालुक्यातील मंगरूळ येथील संगणक परिचालक राहुल रमेश सोनवणे (वय ३२) रा. मंगरूळ याचा आज दुपारी १:३० वाजेच्या सुमारास विहिरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

राहुल रमेश सोनवणे हे आज दि.13 रोजी सकाळी शेतात मजूर लावले असल्यामुळे शेतात गेले होते. त्यांच्या स्वतःच्या शेतातील नगाव शिवारातील विहिरीवर मजुरांना पिण्यासाठी पाणी काढण्यात गेले असता पाय घसरून सुमारे 80 फूट विहीरीत पडल्याने त्यांच्या डोक्यात मार लागून जागीच मृत्यू झाला.

याबाबत भरत सोनू पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुलच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगरमध्ये पहिल्यांदाच गुन्हेगारांची ओळख परेड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रथमच गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपींची ओळख परेड आयोजित...