Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमCrime News : कंपनीचा सर्व्हर हॅक करून 37.56 लाखांची फसवणूक

Crime News : कंपनीचा सर्व्हर हॅक करून 37.56 लाखांची फसवणूक

संगमनेर तालुक्यातील घटना || सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका खासगी कंपनीचा सर्व्हर हॅक करून तब्बल 37 लाख 56 हजार 512 रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे मॅनेजर राहुल किसन पावसे (वय 33, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. ते रियान्श मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, घुलेवाडी, संगमनेर, येथे मॅनेजर पदावर कार्यरत आहे. 29 जून 2026 रोजी सायंकाळी 4.30 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात सायबर गुन्हेगाराने कंपनीचा सर्व्हर हॅक केला.

- Advertisement -

कंपनीच्या 72 सदस्यांच्या बँक खात्यांचे क्रमांक आणि आयएफएससी कोड बदलण्यात आले. मूळ खात्यांच्या जागी आरोपीने स्वतःच्या ताब्यातील किंवा संबंधित खात्यांचे क्रमांक व आयएफएससी कोड टाकून निधी स्वतःच्या फायद्यासाठी वळविल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकारामुळे कंपनीचे एकूण 37 लाख 56 हजार 512 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीने आवश्यक पडताळणी करून 3 जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी अद्याप निष्पन्न झाले नसून, फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली बँक खाती, डिजिटल व्यवहार, सर्व्हर लॉग, आयपी अ‍ॅड्रेस तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...