Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलाच घेणारा हवालदार फरार

लाच घेणारा हवालदार फरार

घोटी | वार्ताहर Ghoti

- Advertisement -

घोटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजाराम डगळे यांनी सरकारी कामाची पाच हजार रूपये लाच घेतली. त्यानंतर डगळे फरार झाले आहेत. त्यांच्यावर घोटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

घोटी पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी यांची दुचाकी सोडवण्यासाठी डगळे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने डगळे यांची याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

तक्रारदारा कडून त्यांनी रक्कम स्वीकारल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांच्या तक्रारीवरून हवालदार डगळे यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार घोटी पोलिसात गुन्हा दखल झाला आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...