Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशBudget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार; कोणत्या...

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार; कोणत्या घोषणा होणार?

नवी दिल्ली | New Delhi

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामधून कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पामधून घरं स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. मेट्रो शहरांमध्ये परवडणारी घरं सर्वसामान्यांना मिळावीत यासाठी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. असं घडल्यास घर खरेदी करणाऱ्या अनेकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात विकासदर वाढवण्यावर विशेष भर असेल. खप वाढवण्यासाठी ठोस घोषणा केल्या जातील. रेल्वे, बंदर आणि विमानतळावर कॅपेक्स वाढू शकतो. मध्यमवर्गीयांसाठी अनेक पावले उचलता येतील. इन्कम टॅक्समध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजार रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे. २० टक्के आणि ३० टक्के स्लॅबमध्ये बदल करण्यास वाव आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये थेट सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. त्यानंतर संसद भवनात (Parliament House) होणाऱ्या या बैठकीत बजेटला मंजुरी दिली जाईल. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

बजेटपूर्वी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये कपात

आज २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून त्यापूर्वीच LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. देशातील सर्वसामान्य जनतेला गॅस सिलेंडरच्या दरात थोडा दिलासा मिळाला आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. मागच्या दोन महिन्यातील दर कपात एकत्र केली तर कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर २० रुपयापेक्षा जास्त कमी झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मार्च २०२४ पासून कोणताही बदल झालेला नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...