Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमतदानाआधीच महायुतीकडून 'या' जागा बिनविरोध; मविआला धक्क्यावर धक्के

मतदानाआधीच महायुतीकडून ‘या’ जागा बिनविरोध; मविआला धक्क्यावर धक्के

मुंबई | Mumbai
राज्यात १७ जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड कायम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या निवडणुकीतही महायुती विरूद्ध मविआ असा थेट सामना राज्यात पुन्हा एकदा रंगलाय. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तर महायुतीला १७ पैकी ६ जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यात यश आले आहे. तर मविआला अनेक ठिकाणी धक्क्यांवर धक्के बसले आहे.

महायुतीला १७ जागांपैकी ६ जागा या बिनविरोध करण्यात यश आले आहे. यामध्ये ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, कोकण मतदारसंघात अनिकेत तटकरे, यवतमाळ, वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे अरुण लखाणी, पुणे मतदारसंघात विक्रम काकडे आणि अहिल्यानगर मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

पुणे विधान परिषद निवडणुक बिनविरोध
पुणे विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाने आदेश दिल्याने माघार घेत असल्याचे श्रीकांत पाटील यांनी सांगितले. दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटल्यानंतर झालेली महत्त्वाची घडामोड घडली आहे.

कोकणमध्ये नवा ट्विस्ट आणि मविआच्या उमेदवाराची माघार
मंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईमुळे कोकणातील जागाही बिनविरोध झाली. राणे यांनी बाळ माने यांची भेट घेऊन जिल्हाधिकार्यालयात नेलं.. बाळ माने यांनी थोड्यावेळापूर्वीच उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्व आमदारांचे आभार मानले. अजित पवारांच्या पुण्याईमुळेच हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

गोविंदा आणि चंकी पांडेंना लॉन्च करणारे जेष्ठ निर्माते आणि सेन्सॉर बोर्डचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच निधन

वर्ध्यात अरुण लखानी बिनविरोध
वर्धा विधान परिषद मतदार संघातील काँग्रेसचे मविआचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे भाजपाचे अरुण लखानी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

तुळजापूरमध्ये बंडखोरी रोखण्यात यश
तुळजापुरचे भाजपचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पत्नी अर्चना गंगणे यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी करत अर्चना गंगणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, अखेर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपकडून बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांच्यामध्ये लढत होणार आहे.

दृष्यंत चतुर्वेदी बिनविरोध
यवतमाळ विधान परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. यवतमाळची विधान परिषदेची जागा बिनविरोध झाली आहे. कारण, येथील सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. शेवटच्या क्षणी भाजप बंडखोर नितीन भुतडा यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदेसेनेचे दृष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले.

नांदेडमध्ये बंडखोरी रोखण्यात यश
नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील बंड रोखण्यात महायुतीला यश आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये महायुतीकडून भाजपच्या अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रवीण पाटील चिखलीकर माघार घेणार असल्याची घोषणा केली होती, त्यानुसार आता प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील ९ महिन्यांपासून फरार मुख्य...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati  फुलेनगर परिसरातील मुंजाबा चौकात झालेल्या दोन गटांतील दगडफेक आणि गोळीबार प्रकरणातील (Firing Case) मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात पंचवटी पोलिसांच्या...