Friday, November 20, 2026
HomeनगरAhilyanagar : शर्यतीत बैलगाडीची धडक बसून प्रेक्षकाचा मृत्यू

Ahilyanagar : शर्यतीत बैलगाडीची धडक बसून प्रेक्षकाचा मृत्यू

आयोजकांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार परिसरातील मोरे मळा येथे झालेल्या बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली असून, एका प्रेक्षकाचा बैलगाडीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मंगळवारी (29 जुलै) दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास मोरे मळा, भिंगार येथे आलमगीर ते मोरे मळा मार्गावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता पार पडत होती. या शर्यतीदरम्यान एक बैलगाडी तिचा निश्चित मार्ग सोडून प्रेक्षकांच्या गर्दीत घुसली. या अपघातात संजय आसाराम जाधव (वय 55, रा. बोल्हेगाव गावठाण, अहिल्यानगर) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी माहिती घेतली असता सदर बैलगाडा शर्यतीचे आयोजन विनापरवाना करण्यात आले असल्याचे समोर आले. तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षीततेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे लक्ष्यात आले.

म्हणून पोलीस अंमलदार दत्तात्रय मोरे यांच्या फिर्यादीवरून दोन आयोजकांविरोधात बुधवारी (30 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबासाहेब मल्हारी मोरे, गोकुळ अनिल पवार (दोघे रा. मोरे मळा, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : चूल अन् तवा सांभाळणाऱ्या हातांनी मारला दारुवर...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात कामावर ठेवलेल्या परप्रांतीय कामगारांची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी घटना गंगापूर रोड...