Thursday, September 3, 2026
Homeक्राईमCrime News : घराचे कुलूप तोडून 16 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

Crime News : घराचे कुलूप तोडून 16 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

बुर्‍हाणनगर (ता. अहिल्यानगर) परिसरातील गुगळे कॉलनी येथे बंद घराचे कुलूप दिवसा तोडून चोरट्याने सुमारे 16 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविता रमेश बनसोडे (वय 48, रा. गुगळे कॉलनी, बुर्‍हाणनगर) यांनी सोमवारी (31 ऑगस्ट) फिर्याद दिली आहे. शनिवारी (29 ऑगस्ट) सकाळी 11 ते सायंकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान बनसोडे यांच्या राहत्या घराला कुलूप होते. याच कालावधीत चोरट्याने घराच्या कुलपाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले विविध प्रकारचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 5 ग्रॅमचे अक्कासाहेब डोरले, 3 ग्रॅमचे दोनपळी मंगळसूत्र, 6 ग्रॅमची ठुशी, 10 ग्रॅमचा चोकर, 10 ग्रॅमची सोन्याची चैन, 26 ग्रॅमच्या दोन बांगड्या, 5 ग्रॅमची कानातील फुले, 3 ग्रॅमच्या कानातील वेल, 7 ग्रॅमचे मिनी गंठन, 2 ग्रॅमचा क्रॉस, 6 ग्रॅमच्या 12 सुट्या मनी, 9 ग्रॅमच्या तीन अंगठ्या, 4 ग्रॅमचे झुमके, 5 ग्रॅमचा कानातील सेट आणि 8 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या अशा दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत 2 लाख 83 हजार रूपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, उपनिरीक्षक योगेश पवार, सुहास आव्हाड आणि बी. बी. अकोलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Belapur : चंपत राय यांच्या जागी बेलापूरचे भूमिपूत्र

0
बेलापूर |वार्ताहर| Belapur येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. काल अयोध्या येथे श्रीराम मंदिर...