सातपूर | प्रतिनिधी | Satpur
सातपूर (Satpur) औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा सोना कंपनीजवळ मंगळवारी (दि. १७) सकाळी सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) एका युवकाचा जागेवर तर दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
- Advertisement -
राजेश कृष्णा भोये असे मृत युवकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून (Police) देण्यात आली आहे. तर धनंजय समाधान पगार (वय २१) रा. सातपूर या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.




