Saturday, July 25, 2026
HomeनगरCrime News : प्रवासात सहा तोळे, घरफोडीत एक तोळ्याचे दागिने लंपास

Crime News : प्रवासात सहा तोळे, घरफोडीत एक तोळ्याचे दागिने लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

प्रवासादरम्यान महिलेचे सुमारे सहा तोळ्याचे दागिने लंपास करण्याची घटना शहरातील चांदणी चौक परिसरात घडली, तर दुसर्‍या घटनेत भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी 50 हजाराची रोकड व सुमारे एक तोळ्याचे सोन्याचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही प्रकरणांमध्ये सुमारे सात तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहे. यासंदर्भात भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पहिल्या घटनेत, गुजरातवरून ट्रॅव्हल्सने वैशाली राजू धुमाळ (वय 39, रा. जळगाव कडा, ता. काष्टी, जि. बीड, हल्ली रा. सुरत, गुजरात) यांच्या सोबत प्रवास करणार्‍या एका महिलेनं त्यांच्याच पिशवीतून सुमारे साडेचार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, साडेआठ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर, पाच ग्रॅमचे कानातील वेल, तीन ग्रॅमची सोन्याची रिंग व 19 भाराचे चांदीचे चैन दोन जोड असा सुमारे 1 लाख 65 हजार रूपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील चांदणी चौक परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी वैशाली धुमाळ यांनी शनिवारी (11 एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून सोजर शिवाजी काळंगे (पत्ता माहिती नाही) या महिलेविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसर्‍या घटनेत वडगाव गुप्ता (ता. अहिल्यानगर) परिसरातील कुलस्वामिनी नगर, उघड मळा येथे भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी (11 एप्रिल) दुपारी दोन ते चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. निसार सलीम शेख (वय 28) हे कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे लोखंडी गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून 50 हजार रूपयांची रोख रक्कम आणि 80 हजार रूपये किमतीचे सुमारे साडेआठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 30 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. यासंदर्भात निसार शेख यांनी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शेख यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...