Friday, November 20, 2026
Homeक्राईमCrime News : बंद घराचे कुलूप तोडून सव्वा लाखांची रोकड लंपास

Crime News : बंद घराचे कुलूप तोडून सव्वा लाखांची रोकड लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील मराठानगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील फर्निचरच्या कपाटात तसेच धान्य ठेवण्याच्या कोठीखालील डब्यात ठेवलेली एक लाख 25 हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. आदर्श ज्ञानदेव तनपुरे (वय 25, रा. तानाजी मालुसरे अपार्टमेंट, मराठानगर) यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनपुरे यांच्या घरी मंगळवारी (17 नोव्हेंबर) रात्री 11.15 ते बुधवारी (18 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.

- Advertisement -

अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील फर्निचरच्या कपाटाची झडती घेतली. तसेच धान्य ठेवण्याच्या कोठीखाली असलेल्या डब्यातही हात घालून तेथील रोकड चोरून नेली. चोरट्यांनी 80 हजार रूपये, तसेच 45 हजार रूपये अशी एकूण एक लाख 25 हजार रूपयांची रोकड लंपास केली. सकाळी आठ वाजताच्या सुमारास घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तनपुरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, विशाल चिटणीस, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे व कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक सपकाळे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : वृध्देच्या साडेचार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जावयाला दोन लाख 15 हजार रूपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून एका भामट्याने वृध्द महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या...