Friday, November 20, 2026
Homeक्राईमCrime News : वृध्देच्या साडेचार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्या

Crime News : वृध्देच्या साडेचार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जावयाला दोन लाख 15 हजार रूपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून एका भामट्याने वृध्द महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या वजन करून देण्याच्या बहाण्याने घेऊन पोबारा केला. चाणक्य चौकात बुधवारी (18 नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत साडेचार तोळे सोने चोरीस गेले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी विमला अशोकलाल भंडारी (वय 76, रा. परदेशी गल्ली, जैन मंदिरामागे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भंडारी या पतीसोबत रिक्षातून घरी जात होत्या. त्यावेळी चाणक्य चौकात दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या जावयाला दोन लाख 15 हजार रूपयांचे कर्ज मंजूर झाले आहे, असे सांगून त्याने भंडारी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांचे वजन करून देतो, असे सांगत त्याने चार सोन्याच्या बांगड्या घेतल्या.

मात्र, बांगड्या हातात घेतल्यानंतर तो दुचाकीवरून पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भंडारी यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : बंद घराचे कुलूप तोडून सव्वा लाखांची रोकड लंपास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील मराठानगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील फर्निचरच्या कपाटात तसेच धान्य ठेवण्याच्या कोठीखालील डब्यात ठेवलेली एक...