Monday, September 28, 2026
Homeक्राईमNewasa : घरफोडी करुन 52 हजार रोख रकमेसह पावणेदोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची...

Newasa : घरफोडी करुन 52 हजार रोख रकमेसह पावणेदोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

पाचेगावफाटा |वार्ताहर| Pachegaon Phata

नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे शनिवारी पहाटे घरफोडी करुन पावणेदोन तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने व 52 हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोपीनाथ संताराम शेजुळ (वय 50) रा. नवीन पुनतगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 10 जुलै रोजी रात्री घरात झोपलेले असताना पहाटे 3 वाजता जाग आली. त्यावेळी दरवाजा उघडा दिसल्याने घरात पाहिले असता कपाटाची उचकापाचक केलेली दिसली.

- Advertisement -

चोरी झाल्याचे लक्षात आले. कुणीतरी अज्ञात चोरट्याने कशानेतरी घराचा दरवाजा उघडून घरातील पेट्या व कपाटात उचकापाचक करुन 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 7 ग्रॅमचा सोन्याचा सर, अर्धा तोळा सोन्याची पोत, 2 ग्रॅमची नथ, एक ग्रॅमची बाळी, सोन्याचे 6 मणी असे पावणेदोन तोळे सोन्याचे दागिने तसेच 14 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने त्याचबरोबर कपाटात ठेवलेली 52 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305 व 331(4) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत.

दरम्यान चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पण माग निघाला नाही. त्यानंतर ठसे तज्ञांना बोलावण्यात आले. त्यात काही ठसे मिळून आले आहेत. पाचेगाव व पुनतगाव येथे चोरीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. याच दरम्यान पाचेगाव येथे तुकाराम घोगरे यांची विद्युत मोटारीची केबल चोरीस गेली. शनिवारी 4 जुलै रोजी दरम्यान पाचेगाव येथे भरवस्तीत देखील जबरी चोरीची घटना घडली होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...