नाशिक | Nashik
राज्यभरात चर्चेत राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी बाजी मारली असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या पराभवानंतर दराडे यांनी ‘महायुतीने माझा विश्वासघात केला’ असे म्हणत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी
यावेळी ते म्हणाले की, “आम्ही विजयासाठी (Won) प्रामाणिकपणे खूप प्रयत्न केले. अगदी मतदानाच्या शेवटच्या दिवशी मी स्वतः पूर्ण वेळ बूथवर उपस्थित होतो. असे असूनही मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला नाही. या मतदारसंघात ६२० पैकी जवळपास पावणे पाचशे मते ही महायुतीची हक्काची होती. तरीसुद्धा आमच्या उमेदवाराला इतकी कमी मते का पडली? याचे कारण शोधण्याची आता गरज आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : “माझा विश्वासघात…”; पराभवानंतर नरेंद्र दराडेंची संतप्त प्रतिक्रिया
तसेच हा निकाल महायुतीसाठी (Mahayuti) अत्यंत धक्कादायक आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. त्यामुळे आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार आहे. नेमके काय घडले, कशामुळे घडले आणि पक्षाच्या पाठीशी कोण उभे राहिले नाही, हा खरोखरच संशोधनाचा विषय असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असेही गिरीश महाजन यांनी म्हणाले.
हे देखील वाचा : Nashik MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गिते विजयी होताच DCM एकनाथ शिंदेनी सूत्रे फिरवली; थेट विशेष विमान…
आमच्या रक्तात विश्वासघात नाही, नरेंद्र दराडेंचे आरोप चुकीचे
विधानपरिषद निवडणुकीत परभव झाल्यानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीने आपला विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, “सध्या पराभवामुळे नरेंद्र दराडे हे वेगळ्या मनस्थितीत आहेत. पण आम्ही त्यांच्यासाठी किती प्रयत्न केले, याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि दादा भुसे यांनाही आहे. माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ असा स्वभाव माझा कधीच राहिलेला नाही. ते माझ्या रक्तातच नाही. पराभवामुळे दराडेंनी महायुतीवर आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशी आमची संस्कृती नाही, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : मतमोजणीला सुरुवात; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंनी विजयी होण्याचा केला दावा
राज्यात महायुतीचीच हवा
मी आधीपासूनच सांगत होतो की विधानपरिषदेच्या १७ पैकी १७ जागा महायुतीच जिंकणार आणि विरोधकांना खातेही उघडता येणार नाही. ते तंतोतंत खरे ठरले आहे. नाशिकची जागा महायुतीला मिळाली नसली, तरी ती विरोधी पक्षालाही मिळालेली नाही (अपक्षाने जिंकली आहे). त्यामुळे संपूर्ण राज्यात विरोधकांचा अत्यंत दारूण पराभव झाला आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
कोणाला किती मते?
नाशिक विधानपरिषद निवडणुकीचे (Election) एकूण ६१९ मतदान (Voting) होते, त्यापैकी ६१८ मतदान (Voting) झाले होते. त्यानंतर आज (सोमवारी) मतमोजणीवेळी १३ मते अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे ३०३ चा कोटा ठरविण्यात आला. त्यामध्ये गिते यांना ३५७ तर दराडे यांना २४८ मते मिळाली. त्यामुळे गिते हे पहिल्याच फेरीत १०९ मतांनी विजयी झाले.




