जळगाव | प्रतिनिधी | Jalgaon
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे (Mahayuti) नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) मोठया मतधिक्याने विजयी झाले आहे. महाजन यांना ५८२ तर आघाडीचे उमेदवार शरद तायडे (Sharad Tayde) यांना अवघी १७ मते मिळाली. आघाडीची सुमारे ६० मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगावात पक्ष निष्ठेची गुढी उभारली गेली तर नाशिकमध्ये बंडाचा कुंभ भरला असे या निकालाचे वर्णन करता येईल.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी
नाशिकची जागा परंपरागत शिवसेनेची (Shivsena) तर जळगावची जागा भाजपाचे असताना नाशिकमध्ये भाजपा जागेसाठी आग्रही होते. तर जळगावत शिंदे सेनेने तयारी सुरू केली होती. अखेर वरिष्ठ पातळीवर तडजोड होऊ नाशिकची जागा शिंदे सेनेला तर जळगावची जागा भाजपाने (BJP) लढवली होती. यावेळी प्रथमच युतीमध्ये प्रचंड अस्वस्थतेचे व संशयाचे वातावरण होते. शेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये भाजपा बंडखोराने माघार घेतल्यानंतर जळगाव शिवसेनेने भाजपा उमेदवाराची प्रचाराची धुरा हाती घेतली होती. चाळीसगावच्या तेरा नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला हे या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. जाहीर झालेल्या निकालात भाजपाचे नंदकिशोर महाजन यांना ५८२ मते मिळाली आहे. तर आघाडीचे शरद तायडे यांना अवघ्या १७ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
हे देखील वाचा : Nashik MLC Election : महायुतीसाठी निकाल धक्कादायक, आमच्या रक्तात विश्वासघात…; दराडेंच्या आरोपांवर मंत्री महाजनांचे प्रत्युत्तर
दरम्यान, उपलब्ध आकडेवारीनुसार जळगाव विधान परिषदेसाठी ६३० मतदार (Voter) होते. त्यात भाजप २४८, शिवसेना १७९, शिवसेना (उबाठा) ०९, काँग्रेस २१, राष्ट्रवादी (अ.प) ३५, राष्ट्रवादी (श.प) २८, एमआयएम ०३, अपक्ष ५३, आघाडी ५४ असे बलाबल होते. जळगावात युती धर्माचे पालन झाल्याने महाजन यांचा विजय सोपा झाला. आघाडीकडे हक्काची सुमारे ८० मते असतांनाही त्यांना १७ मते मिळाली आहे. या निवडणुकीत पैशांची मोठी उलाढाल झाल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये (Nashik) मात्र भाजपाने गद्दारी केल्याचा आरोप करून शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : “माझा विश्वासघात…”; पराभवानंतर नरेंद्र दराडेंची संतप्त प्रतिक्रिया




