Friday, September 11, 2026
HomeनगरAccident News : वाढदिवसाच्या दिवशी कार अपघातात युवकाचा मृत्यू

Accident News : वाढदिवसाच्या दिवशी कार अपघातात युवकाचा मृत्यू

राहाता |वार्ताहर| Rahata

वाढदिवसाच्या (Birthday) दिवशी राहात्यातील युवकावर काळाचा घाला घातला. कार अपघातात (Car Accident) युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राहाता शहरात शोककळा पसरली आहे. अनिल बापुराव जंगम यांचा मुलगा शिवम् हा नाशिक (Nashik) येथे फायनान्स कंपनीमध्ये नोकरीस होता. त्याचा शनिवारी वाढदिवस होता, त्यामुळे तो शुक्रवारी रात्री राहात्याकडे (Rahata) येण्यासाठी निघाला. रात्री 1:30 ते 2 च्या दरम्यान सिन्नर (Sinnar) बायपासवर पुलावर आल्यावर कारचा पुढचा टायर फुटल्यामुळे पुलाचे कठडे तोडून कार (Car) खाली खोल खड्ड्यात पलटी झाली. त्याच्या डोक्यात मार लागल्याने अती रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध झाला.

- Advertisement -

रस्त्यावर भरपूर वाहने गेली, परंतु कोणीही मदतीसाठी थांबले नाही. अखेर 3 वाजता ट्रक (Truck) चालकाच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी सिन्नर पोलिसांना (Sinnar Police) संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन शिवम् याला उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा पूर्वीच तो मयत झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पोलिसांनी मालकाचा शोध घेतल्यानंतर अनिल जंगम यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. सिन्नर (Sinnar) येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून शनिवारी अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आला. नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. शिवम् यांच्या पश्चात आई, वडील आणि एक बहिण असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

मराठा समाज दुखावला, एकेरी भाषेत बोलाल तर…; शिंदे गटाच्या नेत्याचा मनोज...

0
धाराशिव । Dharashiv मराठा आरक्षणाच्या तीव्र लढ्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण...