Thursday, July 23, 2026
HomeनगरAccident News : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Accident News : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

एका चारचाकी वाहनाच्या धडकेत (Car Hit) दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. पाथर्डी-कोरडगाव या राष्ट्रीय महामार्गावर सत्यभामा पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. 25 ) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातातस दुचाकीस्वार शंकर रणजीत बोरुडे (वय 43, रा. बोरुडे वस्ती, दुलेचांदगाव रोड, पाथर्डी) यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

शंकर बोरुडे हे कोरडगाव रोडवरील विजय लॉन्स शेजारील आपले हॉटेल बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना पाथर्डीकडून येणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक (Hit) दिली. धडक इतकी भीषण होती की, कार दुचाकीला धडकून रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात (Accident) कारमधील प्रकाश संभाजी कारखेले (वय 40) आणि सुरेखा प्रकाश कारखेले (वय 35, रा. त्रिभुवनवाडी, ता. पाथर्डी) हे पती-पत्नी जखमी (Injured) झाले. मयत शंकर बोरुडे हे माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे यांचे धाकटे बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून विवाहितेला त्रास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका विवाहित महिलेला वारंवार अश्लील मेसेज पाठवत मानसिक छळ केल्याप्रकरणी संबंधित मोबाईलधारकाविरोधात अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा...