Friday, October 2, 2026
HomeनगरAccident News : कारची दुचाकीला धडक; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

Accident News : कारची दुचाकीला धडक; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

खरवंडी येथील कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढणार्‍या कारमधील चौघा युवकांना बडेवाडी टोलनाक्याजवळ नागरिकांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

या अपघातात रत्ना सुनील राठोड (वय 35, रा. सेवानगर तांडा, तोंडोळी ता. पाथर्डी) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती सुनील उत्तम राठोड हे जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रत्ना व सुनील राठोड हे दुचाकीवरून खरवंडीहून पाथर्डीकडे येत असताना खरवंडी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडकेनंतर दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी रत्ना राठोड यांचा मृत्यू झाला, तर सुनील राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात घडल्यानंतर कारमधील चार युवक घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, सतर्क नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून बडेवाडी टोलनाक्याजवळ त्यांना अडविले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....