Saturday, September 5, 2026
HomeनगरAhilyanagar : भरधाव कारची धडक; रिक्षा, दुचाकी व घराचे नुकसान

Ahilyanagar : भरधाव कारची धडक; रिक्षा, दुचाकी व घराचे नुकसान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

शहरातील बालिकाश्रम शाळेजवळील ढोर गल्ली परिसरात भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा व दुचाकींना जोराची धडक दिल्याची घटना रविवारी (8 फेब्रुवारी) पहाटे घडली. या अपघातात रिक्षा, दुचाकी तसेच घराची भिंत पडून नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या प्रकरणी रिक्षाचालक गणेश जगन्नाथ कोकणे (रा. बालिकाश्रम परिसर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. कोकणे यांनी त्यांची रिक्षा व मोपेड दुचाकी ही वाहने नेहमीप्रमाणे बालिकाश्रम शाळेजवळ, ढोर गल्ली येथे घरासमोर उभी केली होती. परिसरातील इतर नागरिकांचीही रिक्षा व दुचाकी याच ठिकाणी उभ्या असतात. रविवारी पहाटे अंदाजे 2.15 ते 2.30 च्या दरम्यान जोराचा आवाज झाला.

आवाजाने जाग आल्यावर कोकणे यांनी पाहिले असता घराचा लाकडी दरवाजा तुटलेला व घराची भिंत कोसळलेली दिसून आली. बाहेर पाहणी केली असता कार ही बालिकाश्रम रस्त्याकडून दिल्लीगेटकडे जाणार्‍या रस्त्यावरून भरधाव वेगात येऊन घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरात धडकली होती. या धडकेत घराची भिंत पडून रिक्षा व मोपेड एकमेकांवर आदळून त्यांचे मोठे नुकसान झाले.

याशिवाय शेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षांनाही या अपघातात धडक बसून नुकसान झाले आहे. कार चालक शुभम नरेंद्र पेवाल (वय 19, रा. मुन्सीपल कॉलनी, सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) याच्या निष्काळजी व वेगवान वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचे खबरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : आयुष हॉस्पिटलमध्ये तोडफोड; दोन नातेवाइकांसह ५ जणांवर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पंचवटी परिसरातील (Panchvati Area) निमाणी बस स्टँडसमोरील आयुष हॉस्पिटलमध्ये (Aayush Hospital) महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घालत डॉक्टरांना मारहाण...