Sunday, June 7, 2026
Homeक्राईमCrime News : बनावटगिरी करून पाच कार बळकविणारे दोघे अटकेत

Crime News : बनावटगिरी करून पाच कार बळकविणारे दोघे अटकेत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नामांकित वाहन विक्री शोरूमची तब्बल 41 लाख रूपयांची फसवणूक करून पाच नवीन स्विफ्ट डिझायर टुरिस्ट परमीट कार ताब्यात घेतलेल्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली असून फसवणुकीत मिळविलेल्या पाचही कार जप्त करण्यात यश मिळविले आहे. बनावट बँक मेसेज, खोटे यूटीआर क्रमांक आणि न वटणारे धनादेश देऊन ही फसवणूक करण्यात आली होती.

- Advertisement -

सावेडी येथील निर्मलनगर परिसरातील पवन गुरूनाथ पांडव (वय 38) व संतोष त्रिंबक दळवी (वय 44) यांनी 3 जानेवारी 2026 रोजी शिल्पा गार्डनसमोरील महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह मारूती सुझुकी शोरूममधून पाच नवीन स्विफ्ट डिझायर टुरिस्ट परमीट कार खरेदी केल्याचे भासविले. या वाहनांची एकूण किंमत 41 लाख रूपये होती. संशयित आरोपींनी शोरूम व्यवस्थापनाला वाहनांच्या किंमतीची रक्कम भरल्याचे दाखविण्यासाठी बनावट बँक व्यवहाराचे मेसेज व यूटीआर क्रमांक पाठविले. त्यानंतर शोरूमकडून पाच वाहनांची डिलिव्हरी घेण्यात आली.

मात्र प्रत्यक्षात शोरूमच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नव्हता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी 2 जून रोजी दोन्ही संशयित आरोपींना अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळविली. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून तीन कार जप्त करण्यात आल्या. तसेच विक्री केलेल्या उर्वरित दोन वाहनांचा शोध घेऊन तीही पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात व पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोल्हे कारखान्याची 3.87 कोटीची कररक्कम परस्पर वळविली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या संगणकीय प्रणालीतील करभरणा चलनांमध्ये कथितरीत्या अनधिकृत फेरफार करून शासनाच्या तब्बल तीन कोटी 87 लाख 11 हजार 859...