Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिन्नर बसस्थानकातील दुर्दैवी घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल

सिन्नर बसस्थानकातील दुर्दैवी घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

येथील बस स्थानकात ब्रेक निकामी झालेली बस थेट फलटावर चढल्याने एका ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर त्याची आई अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१९) घडल्यानंतर जखमींच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन सिन्नर पोलिसांनी बस चालकासह आगारप्रमुख, कार्यशाळा प्रमुख, पाळी प्रमुखावर गुन्हा दाखल केला आहे.

बस स्थानकात झालेल्या या अपघातात आदर्श योगेश बोर्‍हाडे (९) रा. दापूर या बालकाच्या मृत्यूनंतर तालुकाभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघातानंतर नातेवाईकांनी व भाजपचे उदय सांगळे यांनी बालकाच्या मृतदेहासह रास्ता रोको आंदोलन करत आगाराच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले. जवळपास तासभर आंदोलनकर्त्यांनी पुर्ण महामार्ग रोखून धरला होता. आगारप्रमुख, कार्यशाळा प्रमुख व पाळी प्रमुखांच्या हलगर्जीमुळे हा अपघात घडला असून त्यांना बडतर्फ करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.

विभागीय नियंत्रक कल्याणी ढगे व सिन्नर पोलिस ठाण्याचे निरिक्षक हेमंतकुमार भामरे यांनी आंदोलनकर्त्यांना योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर बालकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले.

अंत्यसंस्कारानंतर रात्री बालकाच्या नातेवाईकांसह जखमींचे नातेवाईक सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव रा. पिंपळे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बस चालक ज्ञानेश्वर चंदू बनगैया रा. कोपरगाव, आगारप्रमुख हेमंत नेरकर, कार्यशाळा प्रमुख दिगंबर पुरी, पाळी प्रमुख रईस यांच्यासह वाहनांची देखभाल दुरुस्ती करणार्‍यांविरोधात कलम २८१, १०६(१), १२५(अ),१२५(ब) व मोटार वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास उपनिरिक्षक खैरनार करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ओळखपत्र अनिवार्य आणि पेन्सिलचा वापर !

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत असणार्‍या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 लागू केले...