Sunday, November 3, 2024
Homeजळगावरावेर येथे दोन लाख ७५ हजार रुपयांची रोकड जप्त

रावेर येथे दोन लाख ७५ हजार रुपयांची रोकड जप्त

रावेर | प्रतिनिधी raver
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरु नाकाबंदीत रावेर पोलिसांनी दोन जणांजवळ मोठ्या प्रमाणत रोकड वाहतूक मिळून आल्याने, कारवाई करण्यात आली आहे. यात २ लाख ७५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.

शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलिसांकडून नाकाबंदी सुरु असतांना सुनिंल लखिचंद लुल्ला वय-४६ रा.आदर्शनगर, भुसावळ याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये रक्कम ८५ हजार २३० रुपये तसेच राहुल सुनिल खटवाणी रा.रावेर याकडून रक्कम १ लाख ९० हजार ७०० अशी एकुण रक्कम २ लाख ७५ हजार ९३० रुपये जप्त करण्यात आली आहे. संबंधीत लोकांना रोकड बाबत पुरावा मागितला असता.त्यांना सबळ पुरावा देता आला नसल्याने कारवाई झाली आहे.

- Advertisement -

व्यापाऱ्यांवर कारवाई झाल्याने नाराजी
शहारातील होलसेल आणि किरकोळ व्यापारी दरोरोज रात्री त्यांची दुकाने बंद करून घरी रोकड नेत असतांना,कारवाई केली जात असल्याने,व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शहरातील व्यापाऱ्यांची शहनिशा करून कारवाई पासून मुक्तता मिळावी अशी मागणी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या