Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण...

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर सीबीआयकडून (CBI) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल देशमुख यांच्यावर आधीच १०० कोटींच्या कथित वसुलीचा आरोप असून ते याच प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने ते अडचणीत सापडले आहेत.

हे देखील वाचा : ‘लाडकी बहीण योजने’वरून शिंदे-पवारांमध्ये श्रेयवादाची लढाई? शिवसेनेची नाराजी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी, गिरीश महाजन यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती. त्यावेळी, त्यांनी थेट अनिल देशमुख यांचे नाव घेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

हे देखील वाचा : महायुतीचा राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा ‘असा’ आहे फॉर्म्युला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची शिफारस

दरम्यान, अनिल देशमुख यांनी ‘एक्स’ मीडियावर पोस्ट करत याबााबत माहिती दिली. त्यानंतर या पोस्टमधून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आव्हान दिले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अजिबात घाबरणार नसल्याचे म्हणत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यावेळी धन्यवाद, देवेंद्र फडणवीस म्हणत देशमुखांनी त्यांच्यावर उपरोधिक टोला लागवला आहे.तसेच, राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन केले जाते, असेही त्यांनी म्हटले.

अनिल देशमुखांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

अनिल देशमुख ट्विट करत म्हणाले की, माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Hasan Mushrif on Sharad Pawar : “पवारसाहेब आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं..”; विधानसभेसाठी मुश्रीफांनी दंड थोपटले

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख गृहमंत्री असताना गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगावमध्येही महाजनांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी देशमुखांकडून मुंढेंवर दबाव टाकला जात होता, असा आरोप आहे. मुंढे यांनीच तसा जबाब सीबीआयकडे दिला आहे. महाजनांवर मोक्काअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याबाबतची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेतच महाजनांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यांनी पेनड्राइव्हमध्ये स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. चव्हाण यांना अटक करण्यात आली. आता देशमुख यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या