Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजहोळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाडी

होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाडी

नाशिकरोड। प्रतिनिधी Nashikroad

होळी सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई एलटीटी-गोरखपूर दरम्यान होळी विशेष ट्रेन चालविणार आहे.

- Advertisement -

एलटीटी मुंबई-गोरखपूर होळी विशेष ट्रेन क्रमांक 05326 ही मुंबई येथून 13 ते 24 मार्चदरम्यान गुरूवार आणि सोमवारी सकाळी 10.20 वाजता सुटेल. गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी रात्री आठला पोहोचेल.

गोरखपूर-मुंबई होळी विशेष गाडी क्रमांक 05325 गोरखपूर येथून मंगळवार आणि शनिवारी 11 ते 22 मार्चपर्यंत 19.00 वाजता सुटेल आणि मुंबई एलटीटी येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 6.50 वाजता पोहोचेल.

या गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, रानी कमलापति-भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई-झांसी, उरई, गोविन्दपुरी, प्रयागराज, अयोध्या, मनकापूर आणि खलीलाबाद येथे थांबे राहील. 4 वातानुकूलित तीन डबे, शयनयानचे चार डबे, जनरल सेकंड क्लासचे चार डबे या गाडीला राहतील.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...