Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजप्रत्येक जिल्ह्यात सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु होणार - मंत्री चंद्रकांत पाटील...

प्रत्येक जिल्ह्यात सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु होणार – मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी MUMBAI

- Advertisement -

राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप), शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अचूक माहिती त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे केली. या केंद्राच्या सेवा उद्या, बुधवारपासून सुरू होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.

मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयत सीईटी संदर्भात बैठक झाली. या बैठकीत बोलताना पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यात सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात येत असून मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे असतील. यापैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्रेही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह माहिती, अचूक मार्गदर्शन सहजपणे त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कामांसाठी वारंवार मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता भासू नये या हेतूने त्यांच्या जिल्ह्यातच ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत, असेही पाटील म्हणाले.

आज झालेल्या बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते.

विद्यार्थी सहाय्यता केंद्राचा उद्देश

● जिल्हयातील शैक्षणिक संस्था, कक्षाच्या अधिनस्त कार्यरत असलेलेल परीक्षा केंद्र आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा यांच्यात समन्वय तसेच संवाद साधणे

● विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील विषय आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया संबंधित आवश्यक ती सर्व तांत्रिक आणि इतर माहिती देणे

● विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, तक्रारीचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचा निपटारा करणे

● विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, पात्रता, क्षमतेनुसार योग्य अभ्यासक्रम, पदवी आणि शैक्षणिक संस्थांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करणे

● सीईटी परीक्षा आणि कॅप फेऱ्यांशी संबंधित अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा पद्धत, वेळापत्रक आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : नगरसेवकांच्या मतांचे ‘वजन’ वाढले; ‘लक्ष्मी दर्शन’वरच...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) आता अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानाला अवघ्या काही तासांवर आले आहे.त्यामुळे...