Saturday, October 3, 2026
Homeक्राईमCrime News : सराईत चैनस्नॅचरला पुण्यातून अटक

Crime News : सराईत चैनस्नॅचरला पुण्यातून अटक

तोफखाना परिसरातील चैनस्नॅचिंगचा उलगडा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार होणार्‍या सराईत चैनस्नॅचरला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केले आहे. संशयिताला पुण्यातील कोथरूड येथून अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान संशयिताकडून तोफखाना पोलीस ठाण्यातील आणखी एका चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्याचीही उकल झाली आहे.

- Advertisement -

9 जुलै रोजी सायंकाळी सावेडी येथील पाईपलाईन रोड परिसरात मानसी जीवन महाजन या महिला जात असताना भरधाव वेगाने दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहिद शेख, विष्णू भागवत, फुरकान शेख, प्रकाश मांडगे आणि प्रशांत राठोड यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या मदतीने संशयिताच्या माग काढला.

तपासादरम्यान सागर रमेश नागपुरे (वय 33, रा. सावतानगर, भिंगार) हा पुण्यातील कोथरूड परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीचे पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबूली दिल्याने अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 62 हजार 190 रूपये रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण एक लाख 32 हजार 190 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सखोल चौकशीत संशयिताने तोफखाना पोलीस ठाण्यात 2025 मध्ये दाखल झालेल्या आणखी एका चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे या गुन्ह्याचाही उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सराईत गुन्हेगाराची पार्श्वभूमी
पोलिसांच्या नोंदीनुसार सागर नागपुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द अहिल्यानगर शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर आणि लोणी पोलीस ठाण्यांत जबरी चोरी, चोरी, मारहाण तसेच शस्त्र बाळगल्याचे मिळून 16 गुन्हे दाखल आहेत. त्यात प्रामुख्याने चैनस्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या नागपुरे याला पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ganesh Gite : शेतकरी, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार; नाशिक बाजार...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Nashik Agricultural Produce Market Committee) प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शेतकरी, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यास...