Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावली

Crime News : महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात दुचाकीवरून जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणा कालडा (वय 44, रा. बागरोजा हाडको, दिल्लीगेट, अहिल्यानगर) यांनी शनिवारी (27 जून) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, 23 जून रोजी सकाळी 8.48 वाजता त्या त्यांच्या एमएच-16 बीडब्ल्यू-3915 क्रमांकाच्या दुचाकीवरून बालिकाश्रम रोडने जात होत्या.

- Advertisement -

सुखदा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर आल्याने त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या, इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची, सोन्याची चैन बळजबरीने ओढून हिसकावली आणि दोघेही घटनास्थळावरून वेगाने पसार झाले. या घटनेनंतर तरूणा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यात येतआहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....