Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedचाळीसगावात उपचार घेणारा निघाला करोना पॉझिटिव्ह

चाळीसगावात उपचार घेणारा निघाला करोना पॉझिटिव्ह

चाळीसगाव – 

शहरातील एका खासगी दवाखान्यात गेल्या दोन दिवसापासून उपचार घेणारा आमोदे ता. नांदगाव येथील तरूण रुग्ण कोरोना पॉझिटिव निघाल्याची माहिती डॉक्टर बी.पी बावीस्कर यांनी दिली आहे. त्यामुळे चाळीसगाव  प्रशासन हादरले असून दवाखान्यात सील करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे.

- Advertisement -

अमोदे ता. नांदगाव येथील रुग्ण गेल्या दोन दिवसापासून चाळीसगाव येथील भडगाव रोड स्थित एका खासगी दवाखान्यात उपचार घेत होता, त्याला कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले.

त्या ठिकाणी त्याचे स्वाब घेऊन तपासणी केली असता. तो करोना पॉझिटिव्ह निघाला. दोन दिवसापासून तो शहरातील रुग्णालयात दाखल असल्यामुळे रुग्णालयात त्याचा अनेकांशी संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे प्रशासनाकडून दवाखाना सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतातरी चाळीसगाव करांनी सावधान होऊन घराच्या बाहेर निघू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...