Monday, October 19, 2026
Homeक्राईमCrime News : चांद्यात 220 किलो गोमांस जप्त

Crime News : चांद्यात 220 किलो गोमांस जप्त

सोनई |वार्ताहर| Sonai

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील दोन ठिकाणी कारवाई करत 2 लाख 43 हजार रुपये किमतीच्या 13 गोवंश जनावरांची सुटका करून 220 किलो गोमांस जप्त करण्यात आले. सहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सोमनाथ झांबरे, रोहित यमुल, सतिष भवर व अरुण मोरे यांना सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढण्यासाठी पाठवले असता या पथकाला चांदा येथे बस स्टॅन्ड समोरील कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील काटवनात काही गोवंश जीवंत जनावरे हे कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेले आहेत तसेच काही जनावरांची कुरेशी मोहल्ला येथील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल चालू आहे, अशी माहिती पोलीस हवालदार सोमनाथ झांबरे यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ घटनास्थळी पंचांसमवेत पाहणी केली असता महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतानाही गोवंश जातीचे जीवंत जनावरे बसस्टॅन्ड समोरील कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील काटवनात कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेले आढळले. तसेच कुरेशी मोहल्ला येथे पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल करताना दिसून आले. त्या ठिकाणी छापा टाकला. अंधाराचा फायदा घेऊन तेथील इसम पळून गेले. या दोन्ही ठिकाणी मिळून एक लाख साठ हजार रुपये किमतीची आठ मोठी जनावरे, पन्नास हजार रुपये किमतीची पाच जीवंत वासरे हे काटवनात तर कुरेशी मोहल्यात तीस हजार रुपये किमतीचे 220 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस असा एकूण 2 लाख 43 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सतीश पोपट भवर यांच्या फिर्यादीवरून लियाकत इस्माईल कुरेशी, साजिद इस्माईल शेख, साकीब जावेद शेख, इर्शाद कदीर कुरेशी, हसनाईन शौकत शेख, गौस मोविन शेख (सर्व रा. चांदा) यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5(अ), 5(ब), 5(क), 9(अ), भारतीय न्याय संहिता कलम 3(5) व प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3,11 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...