Wednesday, August 5, 2026
HomeनगरNewasa : चांदा येथे बनावट दारुच्या कारखान्यावर छापा

Newasa : चांदा येथे बनावट दारुच्या कारखान्यावर छापा

सव्वाचार लाखाच्या दारुसह पावणेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त || स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नेवासा | Newasa

तालुक्यातील चांदा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून 4 लाख 16 हजार 935 रुपयांच्या बनावट दारूसह एकूण 11 लाख 72 हजार 310 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनावट दारू तयार करुन ती विदेशी मूळ कंपनीची असल्याचे भासवून या दारुची हॉटेलला विक्री केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, विजय पवार, अरूण गांगुर्डे, अशोक लिपणे, भगवान सानप व भगवान धुळे यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

- Advertisement -

छापा टाकला त्या ठिकाणी एक इसम चारचाकी वाहनामध्ये दारूचे बॉक्स टाकताना दिसला व एक इसम पत्र्याच्या शेडमध्ये दारू तयार करताना दिसला. पथकाला पाहताच पत्र्याच्या शेडमध्ये दारू तयार करणारा इसम पळून गेला. पथकाने घटना ठिकाणाहुन हुंडाई कंपनीच्या वाहनामध्ये दारू टाकणारा विधीसंघर्षित बालक (वय 17) रा.चांदा, यास ताब्यात घेतले. त्यास पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्याने त्यांची नावे संदिप शिवाजी गायकवाड, रा.चांदा (फरार) असे असल्याचे सांगीतले. अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने राजु जावळे (पूर्ण नाव माहित नाही) रा.चांदा (फरार) व एक अज्ञात इसम यांचेसह बनावट दारू तयार करून विकत असल्याचे सांगितले.

पथकाने पंचासमक्ष या ठिकाणाहुन 4 लाख 16 हजार 935 रुपये किंमतीची बनावट दारु तसेच 7 लाख 50 हजार रुपये किमतीची ह्युंडाई कार तसेच इतर साहित्य असा एकूण 11 लाख 72 हजार 310 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल भगवान मधुकर सानप यांचे फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 347/2026 भारतीय न्याय संहिता कलम 123, 318 (4), 336 (3), 340 (2), महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ब) (ड) (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल
बनावट विदेशी दारूच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या 648 बाटल्या, ओल्ड मंक कंपनीच्या 920 बाटल्या, ओल्ड मंक कंपनीच्या 12 (650 मिली) बाटल्या, बी सेवन स्टर्लिंग कंपनीच्या 160 बाटल्या, इंम्पेरियल ब्लू कंपनीच्या 1050 बाटल्या, इंम्पेरियल ब्लू कंपनीच्या 70 (750 मिली) बाटल्या, रॉयल चॅलेंज कंपनीच्या 270 बाटल्या, मॅजीक मोमेंट जामुन कंपनीच्या 180 बाटल्या, मॅजीक मोमेंट व्होडका कंपनीच्या 96 बाटल्या, ग्रँड मास्टर मँगो कंपनीच्या 60 बाटल्या, ग्रँड मास्टर मेलन कंपनीच्या 80 बाटल्या, मॅकडॉल व्हिस्कीच्या 470 बाटल्या, मॅकडॉल रम च्या 90 बाटल्या, किंग फिशर कंपनीच्या बीयर 65 बाटल्या, आयकॉनीक व्हाईट कंपनीच्या 110 बाटल्या, ब्लेंडर प्राईड कंपनीच्या 25 बाटल्या, ब्लू ओसी कंपनीच्या 65 बाटल्या, साडेसात लाख रुपये किमतीची ह्युंडाई ओरा कार (एमएच 48 सीसी 5447), 4,545 रुपये किमतीचे बाटल्या सीलबंद करण्याचे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लास्टीक बुच, दीडशे रुपये किमतीचे दोन नरसाळे, 4 स्टीलचे कटर, 2 चिकट टेप, 15 रिकाम्या काचेच्या बाटल्या, विविध विदेशी दारूच्या कंपन्यांचे लेबल, 500 रुपये किमतीचे 5 लिटर रसायन असा एकूण 11 लाख 72 हजार 310 रूपये किंमतीचा मुद्देमाल.

ताज्या बातम्या

संपादकीय : ५ ऑगस्ट २०२६ – धर्मांतराचा कायदा आणि स्वातंत्र्याचा तोल!

0
'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ अधिकृत राजपत्रात प्रकाशित होऊन राज्यभरात अमलात आला आहे. या कायद्यानुसार बळजबरी, फसवणूक, आर्थिक प्रलोभने, चुकीची माहिती किंवा लग्नाचे खोटे आश्वासन...