नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाची राजधानी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सीजेपीचं (CJP Protest) आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन शांत झालं, मात्र हे आंदोलन संपलं तरी देखील या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप होत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्यांच्यात विज्ञान विषय येतो. चंद्रकांत पाटील यांनी जे एक नवीन संसोधन केले आहे की दगडावरील ठसे घेऊन आधार कार्डला लिंक केले जातील, या शोधाबद्दल फडणवीसांनी नोबेल पुरस्कार समितीला शिफारस करावी की चंद्रकांत पाटील यांना विज्ञान व संशोधन नोबेल पुरस्कार द्यायला हवा असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांना नोबेल पुरस्कार द्यावा
आज माध्यमांशी बोलताना म्हटलं की, चंद्रकांत पाटील जे बोलले, त्याबद्दल मी ते वाचलं. चंद्रकांत दादा हे उच्चशिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात. चंद्रकांत पाटील यांनी हे जे नवं संशोधन केलेलं आहे, आंदोलनतील दगड, त्यावरचे ठसे घेतले जातील ते ठसे आधार कार्डला लिंक केलं जाईल, या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे.
नंदन निलेकणी २ दिवस कोमात गेले
चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचा विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, चंद्रकांत पाटील यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का?, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आत्तापर्यंत कोणीही लावला नव्हता. दगडावरील हातांचे ठसे घेऊन, ते आधार कार्डला लिंक करायचे, आधार कार्डा शोध केला ते नंदन निलेकणी जे आहेत, ते हा शोध ऐकून 2 दिवस कोमात गेले, हा नवीन शोध आहे, काय करावं ते काही त्यांना सुचत नाही. मला कसं नाही हे समजलं, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
Nashik News: घाट क्षमतेनुसारच वाहनांना प्रवेश; डेटा-आधारित सिंहस्थ आराखड्यावर भर
नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेलं
यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांनी दगडाबद्दल विधानं केली आहेत. त्यांचा दगडाशी फार संबंधं आहे. छातीवर दगड ठेऊन, रस्त्यावरचे दगड घेऊन… काय ते कळलं नाही. त्यांच्या सारख्या ज्ञानी महापुरूषाचा दगडाशी फार संबंध आहे, याचा अर्थ असा आहे की , त्यांच्या पक्षात जे सगळे दगड-धोंडे आलेले आहेत, बिनडोक, त्याचा हा परिणाम दिसतोय, अशी तिखट टीकाही संजय राऊत यांनी केली. त्यांना विज्ञानातला नोबेल पुरस्कार देणं गरजेचं आहे, नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेलं, असाही टोला त्यांनी पुन्हा लगावला.
अमित शाहांवर टिका
अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले पुणेकरांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या, आता म्हणतात तुम्ही कोण पुणेकर, आम्ही टिळक भक्त आहोत, आमच्यासारखे लोक हे टिळक भक्त आहेत, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल या परंपरेला मानणारे आम्ही लोक आहोत, आणि टिळकांचा जहालपणाच आम्ही आमच्या लेखणीतून, वाणीतून, लिखाणातून सातत्याने व्यक्त केलेला, त्याच्यामुळे टिळकांच्या संदर्भात एक भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आमच्यासारख्या लाखो तरुणांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.




