Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-मुंबई वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

नाशिक-मुंबई वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सध्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मुख्य पूलाच्या म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे….

- Advertisement -

या कामाचा एक भाग म्हणून शनिवारपासून सोमवारपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळेत या मार्गावर तुळई बसविली जाणार आहे. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ वाजतापर्यंत आणि रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ पर्यंत पुढील वाहतूक बदल लागू असणार आहेत, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे

हलक्या वाहनांकरीता

प्रवेश बंद – नाशिक, घोडबंदर मार्गे तसेच ठाणे शहरातून कोपरी पूल मार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना तीन हात नाका पूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – नाशिक येथील वाहने साकेत मार्गे, कळवा-विटावा-ऐरोली मार्गे मुंबईत जातील.

पर्यायी मार्ग – ठाणे शहरातील वाहने टपाल कार्यालय, मध्यवर्ती कारागृह मार्ग, कळवा-विटावा-ऐरोली मार्गे-ऐरोली पूल मार्गे जातील.

जड अवजड वाहनांकरीता

प्रवेश बंद – नाशिक मुंबई महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – येथील वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा महापे मार्गे रबाळे-ऐरोली पूल येथून मुंबईत इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – घोडबंदर मार्गे कोपरी पूल, मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजिवडा पूलावर आणि पूला खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – ही वाहने माजिवडा, खारेगाव टोलनाका, गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापे मार्गे, रबाळे -ऐरोली पूल मार्गे इच्छित स्थळी जातील.

किंवा

पर्यायी मार्ग – तीन हात नाका येथून एल. बी. एस. रोडने मॉडेला चेक नाका मार्गे मुंबईत जातील.

किंवा

पर्यायी मार्ग – तीन हात नाका, तुळजा भवानी मंदिर सेवा रस्ता, बारा बंगला, आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईच्या दिशेने जातील.

कोपरी पूलाचे कामकाज सुरु असल्यामुळे नाशिकहून मुंबईकडे येणारी वाहतूक शनिवारी आणि रविवार वळवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून येणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे,

दत्तात्रय कांबळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर, वाहतूक विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या