Wednesday, January 15, 2025
Homeजळगावधर्मदाय रुग्णालयांनी निर्धन, दुर्बल घटकांना अधिकाधिक आरोग्य सेवेचा लाभ द्यावा- जिल्हाधिकारी

धर्मदाय रुग्णालयांनी निर्धन, दुर्बल घटकांना अधिकाधिक आरोग्य सेवेचा लाभ द्यावा- जिल्हाधिकारी

जळगाव – jalgaon
धर्मदाय रुग्णालयांनी जिल्हातील निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना आरोग्य सेवेचा जास्तीत जास्त लाभ द्यावा. या लाभाबाबत प्रसिद्धी माध्यमातून जागृती करावी जेणे करून सामान्य जनते पर्यंत ही माहिती कळेल आणि या सेवेचा लाभ त्यांना घेता येतील असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

या संदर्भात नुकतीच जिल्हास्तरीय धर्मादाय रुग्णालय तपासणी समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अरविदं देशमुख, तज्ञ डॉक्टर डॉ.धर्मेंद्र पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती व्ही.व्ही.राऊत-कारमोर, निरीक्षक ग.गो.आवटे, तहसिलदार श्रीमती ज्योती वसावे इ.सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीसाठी धर्मादाय रुग्णालयांचा तपासणी आराखडा मंजुर करण्यात आला असून जिल्हातील निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना जास्तीत जास्त लाभ देण्याबाबत चर्चा करून धर्मादाय रुग्णालयात कोणकोणत्या आरोग्य सेवेचा लाभ मिळतो याबाबत सर्व प्रकारच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या