Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाचा मोठी कारवाई; ५००हून अधिक जवानांच्या हत्येचे गुन्हे...

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाचा मोठी कारवाई; ५००हून अधिक जवानांच्या हत्येचे गुन्हे दाखल असलेला माओवादी कमांडर ठार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सुरक्षा दलांशी झालेल्या जोरदार चकमक झाली आहे. माओवाद्यांविरुध्द केलेल्या कारवायांमध्ये नक्षलवाद्यांचे अनेक मोठे नेते आणि कमांडर मारले गेल्याने नक्षल चळवळ आता अखेरच्या घटका मोजत आहे. दरम्यान, आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत जहाल माओवादी नेता मडावी हिडमा ठार झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरील नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलाकडून सोमवारी रात्री मोठी कारवाई करण्यात आली. या दरम्यान, डीआरजीचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत काही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात ५०० हून अधिक जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असलेला कुख्यात माओवादी मडावी हिडमा त्याच्या पत्नीसह ठार झाला आहे. त्याच्यावर ६ कोटी रुपयांचे बक्षीस होते.

- Advertisement -

मंगळवारी सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान झालेल्या गोळीबारात दोन्ही बाजूंनी अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांना सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. पोलिसांकडून जंगलात सर्च ऑपरेशन अद्याप सुरूच ठेवण्यात आले आहे.

माडवी हिडमा हा बस्तरमधील नक्षलवाद्यांच्या सर्वात मोठा कमांडर होता. तसेच तो सेंट्रल टीमला सांभाळत होता. त्याच्यावर छत्तीसगडसह इतर राज्यांकडून १ कोटी रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. काही काळापूर्वी सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टाच्या पर्वतरांगांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली होती तेव्हा माडवी हिडमा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र आता तो सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

५०० पेक्षा जास्त जवानांच्या हत्येचे गुन्हे दाखल
दंडकारण्यासह संपूर्ण देशात झालेल्या माओवाद्यांच्या शेकडो हिंसक घटनांचा तो मुख्य सूत्रधार होता. हिडमावर सुमारे ५०० पेक्षा जास्त जवानांच्या हत्येचे गुन्हे दाखल होते. विशेषतः, दंतेवाडा येथे एकाच घटनेत ८० जवान ठार झाले होते, त्या भीषण हल्ल्याचा मास्टरमाईंड हा होता. हिडमाच्या मृत्यूमुळे माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना मोठा धक्का बसला असून, सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. त्याच्या पत्नीलाही ठार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले...