Sunday, February 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal: माजी मंत्री छगन भुजबळांनी घेतली CM फडणवीसांची भेट; दोघांमध्ये अर्धा...

Chhagan Bhujbal: माजी मंत्री छगन भुजबळांनी घेतली CM फडणवीसांची भेट; दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, भाजप प्रवेशावर सुचक विधान

मुंबई | Mumbai
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. या भेटीमुळे छगन भुजबळ भाजपात जाणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर भुजबळांना विचारले असता त्यांनीही सूचक विधान केले.

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आज मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो, त्याचे कारण त्यांच्याकडे गृहखातेही आहे. आमच्या येवला पोलिसांच्या घराचा प्रश्न, अधिक पोलीस बळ हवेत यासाठी त्यांना भेटलो. तसेच लासलगाव मार्केटचे काम आहे. येवल्याचे एज ग्राउंड वरून पाणी आणायचे आहे. हे सगळे मुख्यमंत्र्यांसाठी आणि त्यांच्या सह्यासाठी अपूर्ण आहे, त्या संदर्भात चर्चा झाली, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. मतदारसंघातील अन्य काही प्रश्न होते त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

- Advertisement -

राजकारणाबद्दल चर्चा करण्याचे कारण नाही. माझी जिकडे गरज असते तिकडे मी असतो आणि तिकडे गरज नाही तिकडे मी जात नाही, माझी गरज लागते तिकडे मी जातो म्हणजे शिर्डीला गरज लागलेली होती, तिकडे मी गेलेलो होतो आणि आज काही आवश्यकता नव्हती, असे म्हणत छगन भुजबळांनी सुचक इशारा दिला. मी किती नाराज आहे आणि किती नाराज नाही याचा थर्मामीटर अजून मिळालेला नाही परंतु सगळे त्यांना माहित आहे, असे छगन भुजबळ म्हणाले आहे.

भुजबळांनी राज्यपालपदाच्या ऑफरवर स्पष्टीकरण दिले. मला राज्यपाल पद कुणी ऑफर केले नाही. मी सर्वसामान्य लोकांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर ज्या ज्यावेळी अडचणी येतील, संकट येतात त्या त्यावेळी मला पुढे राहून लढावे लागते. राज्यपालपद मोठे आहे पण मी काही बोलू शकणार नाही, कुणासाठी भांडू शकणार नाही त्यामुळे मला त्या पदापेक्षा मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे पद मोठे आहे असे सांगितले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या