Thursday, May 2, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांची बदली

साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांची बदली

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Sai Baba Trust CEO Bhagyashree Banayat) यांची नागपूर येथे बदली (Nagpur Transfer) झाली आहे. त्यांच्या जागेवर डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांची नियुक्ती झाल्याची चर्चा होती. याबाबतची यादीही सोशल मीडियावर फिरत होती. पण नंतरच्या आदेशात त्यांची नियुक्ती प्रतीक्षाधिन असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे बानायत यांच्या जागी मुंडे की आणखी कुणी? याबाबतची उत्सुकता लागली आहे.

- Advertisement -

अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणार्‍या शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Sai Baba Trust CEO Bhagyashree Banayat) यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई येथून अपर मुख्य सचिव सेवा नितीन गद्रे यांनी काढला आहे.

भाग्यश्री बानायत (Bhagyashree Banayat) यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून बदली झालेली आहे.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Bhagyashree Banayat) यांनी शिर्डी (Shirdi) येथे पदभार स्वीकारल्यानंतर त्या नेहमी वादग्रस्त राहिल्या. वेगवेगळ्या मार्गाने नेहमीच चर्चेत येत होत्या. त्यांची आता नागपूरला (Nagpur) बदली झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या