Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदेंनी 'त्यांना' दिली घराची चावी अन्...

मुख्यमंत्री शिंदेंनी ‘त्यांना’ दिली घराची चावी अन्…

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

कँम्प भागात उभारण्यात आलेली कॅम्प पोलीस स्टेशन, पोलीस उपाधीक्षक कार्यालय व निवासी इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी माजी मंत्री आमदार दादा भुसे (Dada Bhuse), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आदी अधिकारी उपस्थित होते.

Video : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मालेगावला आढावा बैठकीस प्रारंभ

वाहतूक पोलीस सेवकास निवासी खोलीची चावी देत मुख्यमंत्र्यांनी इमारतीचे लोकार्पण केले. यावेळी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. हक्काचे घर मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या