Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSimhastha Kumbh Mela 2027: आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा मुख्यमंत्री घेणार आढावा; उद्या...

Simhastha Kumbh Mela 2027: आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा मुख्यमंत्री घेणार आढावा; उद्या मंत्रालयात बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थात महत्वपूर्ण ठरणाऱ्या रिंगरोडच्या कामाचे सादरीकरण सोमवार दि.21 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर संबंधित विभागाकडून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित राहणार आहेत.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थाच्या नियोजनासाठी बैठका घेण्यात येत आहेत. मात्र अंतिम आराखड्याला मंजुरी मिळत नसल्याने सिंहस्थाची कामे प्रत्यक्षात सुरू होण्यास विलंब होत आहेत. त्यातच सर्वाधिक वेळ लागणारा आणि सर्वाधिक खर्चिक प्रकल्प रिंगरोडचा आहे. दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना बाह्य रिंगरोडचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रिंगरोडचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एमएसआरडीसी सादर केला होता. एमएसआरडीसीने या प्रकल्पासाठी पुण्यातील मोनार्क या सल्लागार संस्थेमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे.

मोनार्क या सल्लागार संस्थेने महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पाथर्डी ते आडगाव दरम्यान ६० मीटर रुंदीचा बाह्य रिंगरोड, तसेच आडगाव ते गरवारे पॉइंट या दरम्यान ३६ मीटर रुंदीचा बाह्य रिंगरोडचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला होता. नवीन भूसंपादन कायद्यानुसार मनपा हद्दीत रिंगरोडसाठी भूसंपादन मोबदल्यापोटी अडीच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

हा खर्च जास्त असल्याने मोनार्क कंपनीने एनएमआरडीएच्या हद्दीतही सर्वेक्षण केले होते. बीओटीवर रिंगरोड उभारणीचा प्रस्ताव कंपनीने एमएसआरडीसीला दिला होता. या दोन्ही प्रस्तावांचे सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीसांसमोर केले जाणार आहे.

 

ताज्या बातम्या

Nashik News : रामकुंडातील काँक्रिटीकरणाचा फटका; विसर्जित अस्थींचे ढीग साचल्याने भाविकांमध्ये...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिकचे रामकुंड (Ramkund) हे अस्थी विसर्जनासाठी देशभरातील हिंदू धर्मीयांचे परम पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणी अस्थी विसर्जित केल्याने मृतात्म्याला...