Saturday, July 25, 2026
Homeनगरनऊवर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

नऊवर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील खंदरमाळवाडी शिवारातील करंजेकर मळा येथील विहिरीत पडून नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Child Death Falling into a Well) झाल्याची घटना सोमवारी (दि.6) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन, श्रीराज बाळू लेंडे हा मुलगा त्यांच्या विहिरीत (Well) पाय घसरून पडला. त्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यास विहिरीतून बाहेर काढून खासगी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत (Death) असल्याचे घोषित केले. नववर्षात ही दुर्दैवी घटना घडल्याने खंदरमाळवाडी गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी लहू वसंत लेंडे यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी (Ghargav Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. एस. व्ही. दिवटे हे करत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...