Friday, May 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपाण्याच्या टाकीत बुडून बालकाचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत बुडून बालकाचा मृत्यू

मतदानाच्या धामधूमीत शाेकमग्न घटना

- Advertisement -

नाशिक। प्रतिनिधी Nashik

झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडल्यावर बुडून सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. १५) दुपारी सातपूर परिसरातील कामगारनगर येथे घडली. कुशल जितेंद्र जैन (वय ६, रा. वृंदावन हाऊस, जैन निवास, कामगारनगर) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुशल हा नेहमीप्रमाणे घरासमोरील गौरव सोसायटीच्या आवारात इतर लहानग्यांसोबत खेळत होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खेळता-खेळता तो अचानक सोसायटीतील झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि तोल जाऊन कोसळला. काही वेळाने ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुशलला पाण्यातून बाहेर काढले. नाकातोंडात पाणी गेल्याने कुशल बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तातडीने गंगापूर रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.bकुशलचे वडील जितेंद्र जैन यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या आघाताने जैन कुटुंबीय शोकाकुल झाले आहेत.

झाकण नसलेल्या पाण्याच्या टाक्यांमुळे लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद असून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Loni : रविवारपासून प्रवरा नदीत पाणी

0
लोणी |वार्ताहर| Loni उन्हाची वाढती तीव्रता आणि नदीकाठच्या गावांमधील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन, दिनांक 10 मे 2026 पासून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा...