बोरद| वार्ताहर –
- Advertisement -
तळोदे तालुक्यातील दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यातील हा पाचवा बळी आहे.
याबाबत अधिक काळ अशी की, दि. २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान दलेलपुर गावाजवळील शेतात रखवाली करणारे कालीबेल येथील तडवी करमसिंग यांचा मुलगा अनिल करमसिग तडवी (वय ९ वर्ष) याच्यावर बिबटयाने हल्ला केला. यात त्याच्या डोक्यावर, तोंडावर गंभीर जखम झाली. अती रक्तस्त्रावात त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्याला डॉंक्टरानी मृत घोषीत केले. त्याचे तळोदा उपजिल्हारुग्नालय येथे शव विच्छेदन करण्यात आले.