Friday, February 13, 2026
Homeक्राईमShrirampur : चिमुकलींशी असभ्य वर्तन करणार्‍या शिक्षकास 6 दिवसांची पोलीस कोठडी

Shrirampur : चिमुकलींशी असभ्य वर्तन करणार्‍या शिक्षकास 6 दिवसांची पोलीस कोठडी

न्यायालयात नेत असताना महिलांकडून चोप

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील एका प्रतिष्ठीत प्राथमिक शाळेतील चिमुकलींशी असभ्य वर्तन करणार्‍या ‘त्या’ शिक्षकास न्यायालयापुढे हजर केले असता दि. 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. श्रीरामपूर शहरातील एका नामांकीत प्राथमिक शाळेत शिक्षक सचिन महाजन गोणारकर (वय 35, गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, ह.मु.वॉर्ड क्र.7, श्रीरामपूर) याने चार मुलींशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली.

- Advertisement -

काल त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला दि. 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, हा प्रकार विद्येचे मंदिर समजल्या जाणार्‍या शाळेत घडल्याने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. संतप्त झालेल्या समाजातील काही महिलांनी सदर शिक्षकास न्यायालयात घेऊन जात असताना रस्त्यातच येथेच्छ चोप दिला. या शिक्षकास आमच्या स्वाधीन करा, अशा संतप्त भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तांदळाऐवजी रेशनकार्ड धारकांना गव्हासोबत मिळणार मका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते. परंतु मार्च महिन्यापासून रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदळाऐवजी...