Monday, September 14, 2026
Homeनगरबाल कामगार ठेवणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा दाखल

बाल कामगार ठेवणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या पथकाने येथील एका कॅन्टीनवर छापा टाकून एका 12 वर्षीय अल्पवयीन बाल कामगाराची सुटका केली. या प्रकरणी श्री स्वामी समर्थ कॅन्टीनचे मालक आणि चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मालक हनुमान अर्जुन डोके (रा. तरडगव्हाण, ता. श्रीगोंदा) व चालक योगेश दिनकर वाबळे (रा. टाकळी ढोकेश्‍वर, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सहायक कामगार आयुक्त ललीत प्रकाश दाभाडे यांनी फिर्याद दिली आहे.

गुरूवारी (20 नोव्हेंबर) सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने धाडसत्राचे आयोजन केले. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, सरकारी कामगार अधिकारी, नगरपालिकेचे प्रतिनिधी, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईन आणि विप्ला फाउंडेशनचे सदस्य यांचा समावेश असलेले संयुक्त पथक दुपारी सव्वाबाराच्या सुमारास शहरातील पुणे बस स्थानकाजवळील श्री स्वामी समर्थ कॅन्टीग येथे पोहोचले.

पथकाने अचानक छापा टाकताच, तिथे एक 12 वर्षांचा अल्पवयीन मुलगा काम करताना आढळून आला. चौकशीमध्ये त्याने सांगितले की, तो सुमारे एक महिन्यापासून या कॅन्टीनमध्ये काम करत आहे; मात्र त्याला अद्याप पगार मिळाला नाही. योगेश वाबळे यांनी ही जागा मालक हनुमान डोके यांच्याकडून चालवण्यासाठी घेतल्याचे सांगितले. तसेच, मुलाला कामावर ठेवले नसल्याचा दावा त्यांनी केला. तथापि, अल्पवयीन बालक कामावर आढळल्याने आणि त्याची खात्री पटल्याने, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ganeshotsav 2026 : नऊ वर्षांनंतर १२ दिवसांचा गणेशोत्सव; हरतालिका, गणेश चतुर्थी...

0
नाशिक | Nashik विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, नाशिक शहर गणेशोत्सवासाठी (Nashik City Ganeshotsav) सज्ज झाले आहे. सोमवारी (दि.१४) गणेशोत्सवाला सुरुवात होत...