Thursday, March 13, 2025
Homeक्राईमप्रियकराच्या मदतीने आईनेच मुलाचा खुन केला

प्रियकराच्या मदतीने आईनेच मुलाचा खुन केला

आरोपी आईसह प्रियकरला अटक

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

प्रेमात अडसर नको म्हणुन आईने प्रियकराच्या मदतीने चार वर्षाच्या मुलाचा खुन (Murder) करून मुलाचा मृतदेह (Child Deadbody) 20 डिसेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील गोदावरी नदीपात्रात (Godavari River) फेकून दिल्याची घटना घडली होती. या घटनेतील दोन्ही आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. चासनळी शिवारातातील नदीपात्रात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह एका गठोड्यात बांधलेल्या अवस्थेत शुक्रवार दि 20 डिसेंबर 2024 रोजी आढळून आला होता. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी पथकसह घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासाची सूत्रे फिरवली व वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू डोक्याला जोराचा मार लागून झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचे गांभीर्याने तपास करत असताना सिसिटीव्हीचे संकलनात एका मोटारसायकल वरून एक महिला आणि पुरुष हे गठोडं नेताना व परत येताना गठोडं नसल्याचे दिसून आले.

- Advertisement -

सदर आरोपीचा (Accused) शोध सुरु असताना दिंडोरी पोलीस स्टेशनला कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय 4 वर्ष दिंडोरी, शितल ज्ञानेश्वर बदादे, वय 25 साकोरी मिग ता. निफाड हे मिसिंग असल्याची तक्रार ज्ञानेश्वर बदादे यांनी केली. यावरून मृतदेह हे कार्तिक ज्ञानेश्वर बदादे 4 वर्ष असल्याची ओळख पटली. तपासाला वेग आला. सदरचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी बायको शितल ज्ञानेश्वर बदादे हिच्या विषयी माहिती दिली. सदरची महिला ही आज दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शितल बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतले. तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ रा. बोर्‍हाळे ता. चांदवड यास सापळा रचून शिताफिने अटक केली.

तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी शिरीष वमणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, हवालदार मधुसूदन दहिफळे, हवालदार संदीप बोठे, पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख, पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ, मोबाईल सेलचे सचिन धनाद, पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे,महिला पोलीस अंजना भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कौतुकास्पद कामगिरीचे शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...