Thursday, May 14, 2026
HomeनगरRahuri : राहुरीत मिठाईच्या दुकानाला भीषण आग

Rahuri : राहुरीत मिठाईच्या दुकानाला भीषण आग

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील जुनीपेठ येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या नाकोडा स्वीट्स या मिठाई दुकानाला आज दि. 9 मे रोजी पहाटे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेमुळे दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आज दि. 9 मे 2026 रोजी पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान शहरातील शिवाजी चौक परिसरात अचानक धुराचे लोट दिसू लागले. दुकानातून निघणारा धूर ऋषिकेश जोशी आणि सर्वेश जोशी यांच्या लक्षात आला. त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत तातडीने राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार, चालक विलास गडाख आणि कर्मचारी करण साळवे यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अग्निशमन यंत्रणांचा वापर करून काही वेळातच आग आटोक्यात आणण्यास यश मिळवले. त्यांच्या तातडीच्या कारवाईमुळे आग इतर दुकानांपर्यंत किंवा इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरली नाही. दुकानाचे मालक दिनेशसिंग राजपुरोहित आणि गोपालसिंग राजपुरोहित यांनी आग लागल्याची माहिती मिळताच आपल्या कामगारांना तातडीने घटनास्थळी पाठवले. त्यांचे वडील सध्या आजारी असल्यामुळे ते राजस्थानमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना फोनवरून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली. अचानक झालेल्या या घटनेमुळे कुटुंबावर मानसिक तणाव निर्माण झाला असल्याचे समजते.

घटनास्थळी आग विझवण्याच्या कामात आणि मदतीसाठी अनेक नागरिकांनी मदतकार्य केले.आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून दुकानातील मोठ्या प्रमाणावर साहित्य, कच्चा माल आणि इलेक्ट्रिक उपकरणांचे नुकसान झाल्याचे समजते. नुकसानाचे अचूक मूल्य अग्निशमन विभाग आणि पोलिस पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी किंवा व्यापक आर्थिक नुकसान टळले. त्यानंतर पोलिस पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.

ताज्या बातम्या

पडसाद : स्वेच्छानिवृत्तीचा दुष्काळात तेरावा!

0
'नाव सोनूबाई हाथी कथलाचा वाळा' ही म्हण नाशिकच्या महापालिकेला सध्यातरी तंतोतंत लागू पडते. कारण राज्यातील काही मोठ्या महापालिकांमध्ये नाशिकची गणना होते. सुमारे साडेतीन हजार...