Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedचोपडा : पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

चोपडा : पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

 ११ जणांवर कारवाई 

शहरातील अग्रसेन भवनच्या आवारात अकरा जण जुगार खेळत असतांना पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या पथकाने अचानक धाड टाकून एक लाख बारा हजार रुपयांचा रोख रकमेसह ऐवज जप्त करण्यात आल्याची कारवाई आज २६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.या धाडीमुळे शहरात एकच खडबळ उडाली.

शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या अग्रसेन भवनाच्या मोकळ्या ओट्यावर आखाजी निमित्त काही जण जुगार खेळत असल्याची खबर मिळल्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, पोना विलेश सोनवणे,पोना संतोष पारधी, पोना शेषराव तोरे,पोना ज्ञानेश्वर जवागे,पोकॉ मिलिंद सपकाळे,पोकॉ सुभाष सपकाळ यांच्या पथकाने अचानक धाड टाकून अकरा जणांना रंगेहात पकडले.यात एक लाख बारा हजाराचा ऐवज त्यात ५२ हजार ८७०रुपये रोख तर ६० हजार रुपये किंमतीचे अकरा मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पो.कॉ.सुभाष वासुदेव सपकाळ यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहरातील सुधाकर शांताराम चौधरी (४३) महावीर नगर, अभिजित योगराज देशमुख (३४) गणेश कॉलनी,अशोक आसाराम पाटील (५२) भाग्योदय नगर,रितेश विनोद डिसा (३९) गुजराथी गल्ली ,राम शंकरलाल सोमाणी (५२) भावसार गल्ली, अजय प्रकाश अग्रवाल (५६) बाळजीमंदिर जवळ,अलोक संतोष अग्रवाल (२९) धानोरा,अमोल सुरेश कासार (३८) मोठा देव्हारा,ललित प्रकाश अग्रवाल (३०)गोलमंदिर मोतीलाल गोपाल साळुंखे (२९) खरद, विलास मोतीराम सूर्यवंशी (३८) बारगनअली चोपडा या अकरा जणांवर जुगार ऍक्ट व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. पोलीस नाईक संतोष पारधी हे करीत आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या