Sunday, July 26, 2026
Homeजळगावचोपडा-बदलापूर ट्रॅव्हल्स अपघातात अमळनेरच्या दम्पत्याचा मृत्यू

चोपडा-बदलापूर ट्रॅव्हल्स अपघातात अमळनेरच्या दम्पत्याचा मृत्यू

अमळनेर : amalner
मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा १५ रोजी पहाटे ३:३४ वा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत मयतात दोघे अमळनेरचे आहेत त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच गावकरी घटनास्थळावर धावले. तात्काळ मदतीचा हात पुढे केला. अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

या अपघातात पियुष पाटील आणि वृंदा पियुष पाटील यांचा मृत्यू झाला तर त्यांची पाच वर्षाची चिमुरडी जखमी झाली आहे. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १४ जण जखमी आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे. पियुष बीएमसी मुंबईला नोकरीला होते तर वृंदा जिप शाळा बोरगाव येथे युवा प्रशिक्षणार्थी होती.

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत...

0
नवी दिल्ली | New Delhi दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेचा (Neet Exam) पेपर फुटीच्या कारणावरून आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर...