Wednesday, September 30, 2026
HomeनगरShani Shingnapur : नाताळ सुट्ट्यांमुळे शिंगणापुरात गर्दीचा ओघ वाढला

Shani Shingnapur : नाताळ सुट्ट्यांमुळे शिंगणापुरात गर्दीचा ओघ वाढला

सोनई |वार्ताहर|Sonai

वर्षाचा शेवटचा शनिवार, नाताळ सणाची सुट्टी (Christmas Holiday) व येणारे नवीन वर्षामुळे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरात (Shani Shingnapur) गर्दीचा ओघ वाढला असून रस्त्यावर अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना भाविकांना करावा लागला. शनिवारी दिवसभरात लाखो भाविकांनी शनीदर्शन (Shani Darshan) घेतले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच असल्याने शनिशिंगणापूरला यात्रेचे स्वरूप आले होते.

- Advertisement -

मध्यान्ह आरतीच्या वेळी मंदिर परिसर व सर्व वाहन तळ गर्दीने फुलून गेले होते. देवस्थान ट्रस्टच्या वतीने वाहन तळापासून बनविण्यात आलेल्या भुयारी दर्शन मार्गे दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडली. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परिसरात दरवर्षी प्रमाणे फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गर्दीचा उच्चांक होणार असल्याने जाणवते.

देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रसाद, बर्फी प्रसाद आदी सुविधा पुरविण्यात येत आहे. देवस्थानचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी भाविकांच्या सुविधेसाठी झटत होते. दर्शन रांग महाद्वारापर्यंत गेल्याने मुख्य रस्त्यावर भाविकांची व वाहनांची गर्दी झाली होती. देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांसह शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 350 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 3653 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...