नवीन नाशिक | प्रतिनिधी
अंबड औद्योगिक (Ambad MIDC) वसाहतीलगत असलेल्या दत्तनगर (Datta Nagar) परिसरातील मारुती संकुल येथील नैसर्गिक नाल्यात काही कंपन्यांकडून रसायनयुक्त पाणी(Non Treated Chemical Water) सोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी (Strong Odor) पसरून सुमारे २०० ते ३०० मीटर परिसरातील नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागला.
बुधवारी (दि. १८) सायंकाळी सातपासून गुरुवारी (दि. १९) सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. नाल्यात सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे परिसरातील वातावरण दूषित झाले. रात्रीच्या वेळी घरातही दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.याच परिसरात काही दिवसांपूर्वी याच परिसरातील बोअरवेलच्या पाण्यात क्रोमियमयुक्त पिवळे पाणी आढळले होते. या पाण्याच्या वापरामुळे रहिवाशांना त्वचारोगांचा त्रास झाल्याचे नागरिकांनी सांगितले. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरी संबंधित प्रशासनाने याठिकाणी रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा इशारा अरुण दातीर, सुमित दातीर, बंटी निमसे, बंटी पाटील, संभाजी मसाळे, उमेश सातभाई, कांताबाई दातीर, संगीता दातीर, मीरा पाटील, रंजना निमसे आदींसह परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.
Nashik News: आरटीओची तीन विशेष वाहनांची नजर; विनाहेल्मेट २९ हजार वाहनचालकांवर कारवाई
कारवाई न झाल्यास आंदोलन
सायंकाळपासून नाल्यात केमिकलमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात होते. त्यामुळे डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचा त्रास झाला. रात्री नागरिकांना मास्क लावून झोपावे लागले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पाहणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी; अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
अरुण दातीर
स्थानिक रहिवाशी


