Friday, July 3, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुण्यातील नागरिकांना दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यास मनाई

मुंबई-पुण्यातील नागरिकांना दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यास मनाई

सार्वमत

मुंबई – राज्यसरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या नागरिकांना आपल्या मुळ जिल्ह्यात जाण्यासाठी सशर्त परवानगी दिली असली तरी रेडझोन असलेल्या मुंबई-पुण्यातील नागरिकांना दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. मात्र परप्रांतीयांना विशेषत: मजुरांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी आहे.

- Advertisement -

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणार्‍या वा अशा शहरात येऊ पाहणार्‍या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून मुंबई, पुणे क्षेत्रात येण्यास परवानगी नाही. दरम्यान मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर विशेषत: मजुरांना जाण्याची परवानगी आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...